भारत बायोटेकची स्वदेशी कोरोना व्हॅक्सीन 77.8% प्रभावी

0
107

भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन कोरोना संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी 81% प्रभावी आहे. तसेच ही लस गंभीर आजारापासून किंवा संसर्गानंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून 100% संरक्षण देऊ शकते. कोवॅक्सिनला मान्यता मिळावी म्हणून कंपनीने 19 एप्रिल रोजी EOI सादर केले होते. भारत बायोटेकचे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) ला WHO ने स्वीकारले होते.

भारत बायोटेक कंपनीने गेल्या आठवड्यात ट्रायलचा डेटा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ला सोपवला होता. मंगळवारी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची यावर महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये लसीच्या तिसऱ्या फेजच्या ट्रायलच्या डेटाला मंजूरी देण्यात आली.डब्ल्यूएचओच्या इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये महामारी सारख्या पब्लिक हेल्थ इमरजेंसीमध्ये हेल्थ प्रोडक्टची सेफ्टी आणि इफेक्टिव्हनेस तपासला जाते.आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता शक्यत तितक्या लवकर औषधे, लस आणि डायग्नोस्टिक टूल्स विकसित करणे आणि त्यास मान्यता देताना सुरक्षितता, कार्यक्षमता आणि गुणवत्तेची मानके पूर्ण करणे आवश्यक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here