सिंधुदुर्ग- सन 2020-21 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनु.जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाचे नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण करण्यासाठी दिनांक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन 2019-20 च्या अर्जासाठी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे.
तरी संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी 2020-21 करिता नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण दिनांक 30 सप्टेंबर 2021 अखेर व सन 2019-20 च्या अर्जाची मुदवाढ शेवटची 15 सप्टेंबर 2021 अखेर पर्यत त्वरीत अर्ज भरण्यात यावेत.
नवीन अर्ज नोंदणी करणे व अर्ज नुतनीकरण करणेबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.02362-228882 येथे संपर्क साधावा. असे आवाहन दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे