कोरोनामुळे देशात सगळीकडेच भीषण परिस्तिथी आहे. त्यातच जवळ-जवळ प्रत्येक घरात कोरोनामुळे मृत्य झाला आहे. दिल्लीची परिस्थिती काही वेगळी नाहीय. तसेच काही मुलांनी कोरोना संक्रमणाच्या त्यांचे आई-वडील दोन्ही गमावले आहेत. तसेच अनेकांचा लॉकडाऊनमुळे रोजगार गेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटाच्या काळात समाजातील अशा लोकांच्या कुटुंबियांना थोडी मदत पोहोचवित दिलासा देण्याचा निर्णय दिल्लीच्या केजरीवाल सरकारने घेतला आहे.
दिल्लीसाठी अरविंद केजरीवाल सरकारने 4 मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये मोफत राशन, मृत्यूनंतर नुकसान भरपाई आणि प्रभावित पडलेल्या कुटुंबांना पेंशन देऊन दिलासा देण्यात आला आहे.ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची नुकसान भरपाई मिळेल.
ही घोषणा करताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली सरकारने प्रामाणिकपणे काम केले आहे आणि भ्रष्टाचार कमी केला आहे. जो पैसा भ्रष्टाचार कमी झाल्यामुळे वाचला आहे, त्यामधूनच या घोषणा पूर्ण केल्या जातील असे सांगितले आहे.
मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल सरकारच्या 4 मोठ्या घोषणा– 1-जे राशन मागतील, त्यांना राशन दिले जाईल. 2- ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे द्यांच्या कुटुंबियांना 50 हजारांची नुकसान भरपाई मिळेल.3 -ज्यांच्या घरात कमावत्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबियांना 50 हजारांची नुकसान भरपाई आणि अडीच हजार रुपये महिना पेंशन दिली जाणार. 4-ज्या मुलांनी आपले आई-वडील गमावला आहेत, त्यांना 2,500 रुगपये महिना दिला जाईल. ही मदत त्यांना वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत मिळत राहिल. यासोबतच त्यांना मोफत शिक्षणही दिले जाणार.