सिंधुदुर्ग: मंदार शिरसाट यांची गोवा राज्य युवासेना विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल आ.वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

0
70
मंदार शिरसाट यांची गोवा राज्य युवासेना विस्तारक पदी निवड झाल्याबद्दल आ.वैभव नाईक यांयांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कुडाळ:शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोवा राज्याच्या युवासेना विस्तारक पदी कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांची नियुक्ती केली आहे.याबद्दल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे मंदार शिरसाट यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,प्रणव वर्दम,राकेश वर्दम,रवी राऊळ,श्री.पडते आदी उपस्थित होते.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here