मनोरंजन:”स्टोरीटेल मराठीवर नामवंत कलावंताच्या आवाजात पुलंच ‘गणगोत’!

0
69
स्टोरीटेल मराठीवर नामवंत कलावंताच्या आवाजात पुलंच 'गणगोत'!
स्टोरीटेल मराठीवर नामवंत कलावंताच्या आवाजात पुलंच 'गणगोत'!

मराठी साहित्य, संस्कृती विश्वात केवळ आदरानेच नव्हे तर अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके, वक्तृत्व कुशल, नाटककार, संगीतकार, उत्तम अभिनय करणारे, ज्यांचं विनोदी वाङ्मय अवघ्या महाराष्ट्राला आजही खळखळून हसायला भाग पाडतं, असे एकमेव अवलिया, आपल्या सर्वांचे लाडके भाई, म्हणजेच पद्मभूषण “पु.ल. देशपांडे”. वाचक रसिकांना जशी त्यांच्या साहित्याची भुरळ पडते तशीच मराठीतील दिग्गज कलावंतांही पडते. लोकप्रिय जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अविनाश नारकर, अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, आस्ताद काळे, सौरभ गोगटे , नचिकेत देवस्थळी, संदीप खरे यांनी पुलंच्या लोकप्रिय साहित्यकृतींना आपल्या आवाजाचा नवा साज स्टोरिटेल मराठीचे व्यासपीठ निवडले आहे. या दिग्गजांच्या आवाजात पुलंच्या लोकप्रिय पुस्तकांतील कथांचे ‘ऑडिओबुक्स’ संपूर्ण एप्रिल महिन्यात रसिकांना ऐकता येणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtr-ग्रीनलाईनतर्फे-अल्ट्र/

पुलंच्या लोकप्रिय पुस्तकांतील मनोरंजक कथा नामवंतांच्या आवाजात ऐकण्याची ही संधी १ एप्रिल पासून स्टोरीटेल मराठीवर सुरु झाली असून, अभिनेता सौरभ गोगटे यांच्या आवाजातील  ‘गुण गाईन आवडी’ मधील ‘माझे एक दत्तक आजोबा’, ‘डॉ लोहिया : एक रसिक तापस’, ‘मंगल दिन आज’, ‘मैत्र’ मधील ‘नानासाहेब गोरे:प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेले’, ‘शाहू महाराज:एक धिप्पाड माणूस’, ‘हमीद:एक श्रेष्ठ प्रबोधनकार’, ‘जीवन त्यांना कळले हो’, ‘जाने क्यूं आज तेरे नाम पे रोना आया’  या ऑडीओ कथांना जगभरातील रसिकश्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नामवंत अभिनेत्यांच्या आवाजात  ८ – एप्रिल रोजी पुलंचे ‘गणगोत’ तर १२ एप्रिलला ‘खिल्ली’ ‘ऑडिओ बुक्स’ मध्ये रसिकांसाठी उपलब्ध रिलीज होणार आहे.

गणगोत मधील ;दिनेश’, ‘संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे’, ‘बळवंत मोरेश्वर पुरंदरे’, ‘रामुभैय्या दाते’, ‘रावसाहेब’ या कथा अभिनेता सौरभ गोगटे यांनी वाचल्या आहेत तर खिल्ली मधील ‘एका गांधी टोपीचा प्रवास'(अजय पुरकर), ‘पु. ल. तुम्ही स्वतःला कोण समजता?'(अविनाश नारकर), ‘भाईसाहेबांची बखर'(दिलीप प्रभावळकर), ‘तू माझी ‘माऊ’ ली’ (संदीप खरे), ‘शेवटचे कवी – संमेलन’ (संदीप खरे), ‘हवाई सुंदरी, दूरध्वनिकर्णिका आणि सौजन्य'(चिन्मय मांडलेकर), ‘तुम्हाला कोण व्हायचे आहे? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?'(अविनाश नारकर),’काही नव्या राजकीय ध्वनिमुद्रिका’ (नचिकेत देवस्थळी), ‘यशवंतराव भागिले यशवंतराव'(अजय पुरकर), ‘आम्हांलाही उबाग'(अविनाश नारकर), ‘आम्ही सूक्ष्मात जातो'(संदीप खरे), ‘आठ आण्याचे गणित'(दिलीप प्रभावळकर), ‘लोकमान्य आणि आम्ही'(संदीप खरे), ‘लोकशाही: एक सखोल चिंतन'(चिन्मय मांडलेकर), ‘जनता शिशुमंदिरात आम्ही'(संदीप खरे), ‘मी – हारून अल रशीद'(अविनाश नारकर), ‘अंतुलेसाहेब,तुम्हारा चुक्याच'(नचिकेत देवस्थळी) या मान्यवरांच्या आवाजात ऑडिओ बुक्समध्ये स्टोरिटेलवर वरील सर्व साहित्यकृती रसिकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.

‘स्टोरीटेल’ या जगविख्यात समूहाने मराठीतील दर्जेदार साहित्य नामवंतांच्या आवाजात स्टोरिटेलवर आणूनते दीर्घकाळ टिकावे आणि नव्या पिढीसाठी हा वारसा सर्वोत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे  ‘ऑडिओ बुक्स’च्या माध्यमातून जतन करण्याचे बहुमोल कार्य गेल्या पाच वर्षांपासून सुरु केले आहे. आपल्या भाषेतील दर्जेदार आणि दुर्मिळ साहित्य अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  स्टोरिटेलने आपले जगभरातील लोकप्रिय व्यासपीठ उपलब्ध करून मराठी साहित्यप्रेमी रसिकांची आवड जोपासली आहे.

‘स्टोरीटेलवर ‘एप्रिल पुल’ मधील पुलंचं लोकप्रिय साहित्य ‘ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू.१४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- भरून मराठी भाषेतील हजारो ऑडिओबुक्स ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

‘पुलंची लोकप्रिय ऑडिओबुक्स’ ऐकण्यासाठील लिंक

‘गणगोत’

https://www.storytel.com/in/en/books/gangot-2379329

‘खिल्ली’

https://www.storytel.com/in/en/books/khilli-2401149

‘गुण गाईन आवडी’

https://www.storytel.com/in/en/books/gun-gaeen-awadi-2256406

‘मैत्र’

https://www.storytel.com/in/en/books/maitra-2256407

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here