मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची मराठी सिनेसृष्टीत ग्रँड एन्ट्री होणार आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची भूमिका तो साकारणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर दौडले सात’ या सिनेमात तो ही भूमिका साकारणार आहे. या मल्टीस्टारर सिनेमातील सर्व कलारांना बुधवारी एका शानदार सोहळ्यात समोर आणण्यात आलं. मराठी, तेलुगू, हिंदी भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे असे समजते.

