मनोरंजन: अभिनेता सतीश कौशिक यांचे दिल्लीत निधन

0
88
अभिनेता सतीश कौशिक यांचे दिल्लीत निधन

अभिनेता सतीश कौशिक यांचे दिल्लीत निधन सतीश हे दिल्ली मध्ये आपल्या नातेवाईकांकडे होळी निमित्त गेले होते तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यांचा पार्थिव देह आज मुंबईत आणण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी अभिनेता सतीश कौशिक यांचा मृतदेह आज एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात येत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर वर्सोवा येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

7 मार्च रोजी जावेद अख्तर यांनी जानकी कुटीर जुहू येथे आयोजित केलेल्या होळी पार्टीत कौशिक यांनी होळी खेळली होती. या आनंदोत्सवाचे त्यांनी फोटो ट्विट केले होते. त्यात लिहले होते की, जावेद अख्तर, शबाना आझमी, बाबा आझमी, तन्वी आझमी यांनी आयोजित केलेल्या होळी पार्टीत रंगीबेरंगी होळीचा आनंद घेतला. अली फलाज आणि ऋचा चढ्ढा हे नवविवाहित जोडपे भेटले. सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी त्यांनी थिएटरमध्ये काम केले. ते एक अभिनेता, विनोदी अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते होते. सतीश कौशिक यांना 1987 मध्ये आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातून अधिक ओळख मिळाली. त्यानंतर 1997 मध्ये आलेल्या दिवाना-मस्ताना मध्ये पप्पू पेजरची भूमिका केली. सतीश यांना 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये ‘साजन चले ससुराल’ साठी सर्वोत्कृष्ट विनोद कलाकार हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here