मुबंई– सिनेजगतातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे सांगितले जात होते. विक्रम गोखले यांच्या पत्नीने या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते. मात्र, आज विक्रम गोखले यांची प्राणज्योत मावळली आहे. विक्रम गोखले यांनी फक्त मराठीच चित्रपट नाही तर अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत

