मुंबई:अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त त्यांचा मुलगा होशिंग गोविल यांनी दिले. गेल्या वर्षी त्या कोरोनाने गंभीर आजारी होत्या. त्यांचा अंतिमसंस्कार झाल्यावरच सर्वांना त्यांच्या निधनाचे वृत्त द्यावे अशी त्यांची अंतिम इच्छा असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. त्यांचा मृत्यू शुक्रवार दिनांक १८ रोजी झाल्याचे त्यांनी सांगितले.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-दृश्यम 2-रिलीजच्या-पहिल्/
त्यांना गॅस्ट्रिकचा त्रास होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिस्चार्जही देण्यात आला, मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावली. दोन मिनिटांत त्यांना दोन हृदयविकाराचे झटके आले.