मनोरंजन : अरे जारे हट नटखट” रंगपंचमीतील अभिनयाची आतिषबाजी करणारी अभिनेत्री तथा नृत्यांगना संध्या यांच्या ८५ वा जन्मदिन

0
19
अभिनेत्री तथा नृत्यांगना संध्या यांच्या ८५ वा जन्मदिन
अरे जारे हट नटखट" रंगपंचमीतील अभिनयाची आतिषबाजी करणारी अभिनेत्री तथा नृत्यांगना संध्या यांच्या ८५ वा जन्मदिन....

मुंबई:

लेखन- संतोष भोसेकर. – शुक्रवार;दिनांक २७ सप्टेंबर २०२४ अभिनेत्री, नृत्यांगना डोक्यावर मडक्याची उतरंड घेऊन “आधा है चंद्रमा रात आधी” म्हणणारी नृत्यातील कसब पणाला लावून “अरे जारे हट नटखट” रंगपंचमीतील अभिनयाची आतिषबाजी करणारी अभिनेत्री तथा नृत्यांगना संध्या यांचा आज ८५ वा जन्मदिन.

अभिनेत्री संध्या यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३८ साली कोची केरळ येथे झाला. संध्याबाईंचे वडील हे पडद्यामागचे कलाकार होते. त्यांची मोठी बहीण वत्सलाबाई देशमुख आणि संध्या यांना अभिनयाची आवड होती. त्या दोघी बहिणी सुलोचना यांच्या बालमेळ्यात काम करीत.व्ही. शांताराम यांनी सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वाच्या या मुलीकडे खास कलागुणांपेक्षा तिच्या आवाजाने प्रभावित होऊन “अमर भूपाळी” या चित्रपटासाठी संध्या यांची निवड केली. संध्याचे चित्रपटसृष्टीतील पहिलं पदार्पण होतं. कल्पनेची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांचा अभिनय आणि शांताराम यांचे दिग्दर्शन कौशल्य यामुळे चित्रपट अत्यंत गाजला. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही हा चित्रपट वाखाणला गेला. त्यावेळी रसिक प्रेक्षकांचे लक्ष भावपूर्ण डोळे असलेल्या संध्या यांच्याकडे आकर्षित झाले. त्यानंतर शांताराम यांनी “परछाई” चित्रपटात जयश्री बाई (शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी) यांच्या सहनायिकेची भूमिका संध्या यांना दिली. त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद त्यासाठी लावली.त्यांच्या अभिनय क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान “तीन बत्ती चार रस्ता” या चित्रपटातील गोड गळ्याची गायिका कोयल या भूमिकेमुळे मिळाले. सावळ्या मुलींना कोणते प्रश्न भेडसावतात आणि त्यावरील तोडगा कसा काढला जातो हे दाखवून संवाद फेक अतिशय मर्मग्रही व लक्षात राहणारी आहे. “झनक झनक पायल बाजे” या चित्रपटातील “नीला” साकारून संध्या यांनी नृत्यांगणा म्हणून प्रसिद्धी मिळवली. संध्याबाईंनी गुरु गोपीकृष्ण यांच्याकडून कथक शिकल्या. दिवसाकाठी १५ ते १६ तास अथकपणे त्या नृत्याचा सराव करीत. आणि त्यानंतर त्यांनी भूमिका केली. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

संध्याच्या नृत्याला सिने रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. संध्याच्या अभिनय कौशल्याला नृत्याची जोड मिळाली. या चित्रपटाला फिल्मफेअर ने गौरविण्यात आले. “दो आखे बारा हात” या चित्रपटात खेळणी विकणाऱ्या चंपाची भूमिका केली. चित्रपटातील त्यांची भूमिका केंद्रस्थानी होती व्ही शांताराम यांच्याबरोबर १९५६ मध्ये विवाह झाला. व्ही.शांताराम यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया दरम्यान त्यांची मनोभावे सेवा सुश्रुषा केली. डोळ्यावरची पट्टी काढण्याच्या दिवशी शांताराम यांची खोली संध्याबाईंनी फुलांनी सजवली हे पाहून शांताराम यांना “नवरंग” चित्रपटाची संकल्पना सुचली. “नवरंग” चित्रपटात संध्या यांनी “यमुना” ही भूमिका कसदारपणे केली. “अरे जारे हट् नटखट” हे रंगपंचमीच्या गाण्याने नृत्याची आतिषबाजी उडवून दिली. शांताराम यांना हे गाणं खूप खास बनवायचे होतं. त्यांनी खरे खुरे हत्ती, घोडे यांची व्यवस्था सेटवर केली होती. त्यांच्याबरोबर नृत्य करून संध्या यांनी धमाल उडवून दिली.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिनेट-निवडणुकांचे-निकाल/

महाकवी कालिदास यांच्या आयुष्यात नाटक शाकुंतल यावरून “स्त्री” हा चित्रपट व्ही शांताराम यांनी केला. संध्या यांनी “शकुंतला” साकारली. याच चित्रपटात वास्तवता येण्यासाठी त्यांनी सिंहा बरोबर काम केले. “पिंजरा” मराठी चित्रपट त्यांच्या अभिनय क्षेत्रातला होता अभिनयाचा कळसाध्याय होता.नृत्य आणि अभिनय या दोन्ही सशक्त कलांमुळे पारंपरिक लावणीच्या नृत्याविष्कारामुळे चित्रपटाला रसिकांनी डोक्यावर घेतले. श्रीराम लागूंच्या सोबत काम करण्याचे आव्हान त्यांनी लीलया पेलले . चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर संध्या यांनी चित्रपट क्षेत्रातून जवळ जवळ निवृत्तीच घेतली.
आपल्या ४६ वर्षाच्या अभिनयाच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी अशा केवळ १४ चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. रसिकांच्या हृदयावर त्यांनी अधिराज्य गाजवणाऱ्या संध्या आज ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना निरामय दीर्घायुष्य प्राप्त व्हावे या शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here