मनोरंजन: “एका साध्यासुध्या माणसापेक्षा एक नकारात्मक व्यक्तिरेखा साकारणे सोपे असते”- आकाश आहुजा

0
59
‘बादल पे पांव है’
एका साध्यासुध्या माणसापेक्षा एक नकारात्मक व्यक्तिरेखा साकारणे सोपे असते”"- आकाश आहुजा

सोनी सबवरील ‘बादल पे पांव है’ मालिकेतील बानीचा प्रवास कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या कष्टाळू, मध्यमवर्गीय मुलीची भूमिका केली आहे अमनदीप सिद्धूने. बानी महत्वाकांक्षी आणि जिद्दी आहे आणि जीवनाच्या मर्यादांना न जुमानता आपल्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्याचा तिने निर्धार केला आहे. तिच्यासोबत या मालिकेत आहे आकाश आहुजा, जो रजत खन्ना नामक व्यक्तिरेखा साकारत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रधानमंत्री-सूर्यघर-यो/

आकाश आहुजाने या मालिकेतील आपल्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू, चंदीगडमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव, सरगुन मेहता आणि रवी दुबे या निर्मात्यांसोबत काम करण्याचा गौरव आणि इतर अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.

‘बादल पे पांव है’ मालिकेतील रजत खन्ना या तुझ्या व्यक्तिरेखेविषयी आम्हाला सांग. तू या भूमिकेकडे कसा आकर्षित झालास?

मी साकारत असलेला रजत एक साधासुधा तरुण आहे. त्याची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे आणि जीवनातील छोट्या छोट्या सुखांमध्ये तो समाधानी आहे. त्याचा एक छोटा व्यवसाय आहे. आपल्या प्रियजनांचे सुख आणि कल्याण हेच त्याच्या लेखी सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्याकडे जे काही आहे, त्यातच तो आणि त्याचे कुटुंब आनंदी, समाधानी आहे. मध्यमवर्गीय मूल्ये आणि आकांक्षा जपणारा रजतच्या स्वभावातला प्रामाणिकपणा आणि साधेपणा पडद्यावर साकारण्याची संधी मला फार मोलाची वाटली.

रजतचे वर्णन एक साधासुधा सामान्य तरुण असे करण्यात आले आहे. इतकी सामान्य आणि चारचौघांसारखी व्यक्तिरेखा साकरताना तुझा दृष्टिकोन काय आहे?

अगदी साध्यासुध्या आणि चारचौघांसारख्या स्वभावाचा रजत बराचसा माझ्यासारखा आहे. माझ्या स्वभावातले अनेक गुण मला रजतमध्ये दिसतात. कारण तो देखील साधी मूल्ये असलेला एक सामान्य माणूस आहे. अधिक गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेपेक्षा रजतचा प्रामाणिकपणा त्याच्या दैनंदिन वागण्यातून झळकतो आणि तो पटकन आपलासा वाटतो. रजत साकारताना माझ्या स्वतःच्या अनुभवांचाच आधार मी घेत आहे आणि त्याच्या निखालस आणि सरळमार्गी स्वभावाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत आहे.

‘बादल पे पांव है’ मालिकेतील आणि या विषयातील कोणता पैलू तुला सर्वाधिक आवडला आहे?

‘बादल पे पांव है’ मालिकेत मला सगळ्यात जास्त काय आवडले असेल, तर ते म्हणजे मालिकेची प्रेरणादायक संकल्पना. बानी छोट्या शहरातली मुलगी आहे पण तिची स्वप्ने मोठी आहेत आणि आपल्या घरातून तिला पुरेसा पाठिंबा नाही आहे. अशा अनेक अडचणी असून देखील ती आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याबाबत ठाम आहे. हा एक दमदार संदेश आहे की, महत्त्वाकांक्षेला कोणत्याच मर्यादा नसतात. आणि प्रत्येकाला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची संधी मिळालीच पाहिजे.

रजत ही व्यक्तिरेखा साकारताना तुझ्यापुढे कोणती आव्हाने होती? आणि या भूमिकेसाठी तू तयारी कशी केलीस?

रजत साकारत असताना सुरुवातील माझ्यापुढे विशेष अशी कोणतीच आव्हाने नव्हती. तो अत्यंत साधा, जीवनाबद्दल समाधानी माणूस आहे. पण बानी त्याच्या आयुष्यात आल्यानंतर चित्र पालटते. त्यांच्या नात्यामुळे गुंतागुंत वाढते. कारण बानी आपल्या स्वप्नांसाठी धडपड करणारी आहे, तर रजत आहे त्यात समाधान मानणारा आहे. कथानक पुढे सरकेल, तेव्हा त्यांच्या स्वभावातल्या या विरोधाभासामुळे आव्हाने येतील पण त्यामुळेच ही भूमिका आकर्षक बनते.

अमनदीप सिद्धू सोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?

अमनदीप सोबत काम करण्याचा अनुभव फारच छान आहे. सुमारे एक महिन्यापासून आम्ही शूटिंग करत आहोत. आत्तापर्यंत सारे काही सुरळीत चालू आहे. आम्ही दोघे या उद्योगातील व्यावसायिक आहोत. माझ्या पाठीशी एक दशकापेक्षा मोठा अनुभव आहे. सेटवर व्यावसायिक आणि मैत्रीपूर्ण वातावरण ठेवण्याची समज आमच्या दोघांमध्ये आहे.

चंदीगडमध्ये शूटिंग करताना सगळ्यात जास्त कोणती गोष्ट तुला आवडली? आणि मालिकेच्या विषयात त्याचे योगदान काय असेल?

माझ्यासाठी चंदीगडमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव मस्त होता. कारण, एक तर, त्यामुळे माझ्या दिल्लीत राहणाऱ्या कुटुंबाच्या जवळ राहण्याची संधी मला मिळाली. आमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य दाखल झाला आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्यास मी उत्सुक आहे. शिवाय, चंदीगडचे चैतन्यमय वातावरण आणि पंजाबी संस्कृती मालिकेच्या विषयासाठी पूरक आहे आणि त्यामुळे पंजाबी कुटुंब साकारताना त्यात अस्सलतेची जोड मिळते.

रवी दुबे आणि सरगुन मेहता यांच्या प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसच्या मालिकेत काम करताना कसे वाटते आहे?

रवी आणि सरगुन खूप मोठा अनुभव गाठीशी असलेले व्यावसायिक आहेत आणि अलीकडच्या काळात त्यांनी काही उत्कृष्ट मालिका दिल्या आहेत. त्यांचे वेगळेपण त्यांच्या प्रायोगिक दृष्टिकोनात आहे. मालिकेच्या प्रत्येक पैलूत- निर्मितीपासून ते एपिसोड्सचे दिग्दर्शन आणि कथानक उभे करण्यात ते रस घेतात. या प्रकल्पात गुंतलेल्या आम्हा कलाकारांसाठी निर्मात्यांचे परिश्रम आणि त्यांची निष्ठा प्रेरणादायक आहे.

रजतच्या उपस्थितीमुळे बानीच्या प्रवासावर आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या तिच्या मार्गाच्या जडणघडणीवर काय प्रभाव पडणार आहे?

बानीची स्वप्ने मोठी आहेत आणि तिला उंच आकाशात भरारी घ्यायची आहे. रजतच्या उपस्थितीमुळे तिला एक स्थिरता आणि दृष्टी मिळते. तो तिचे जमिनीशी नाते तुटू देत नाही. मार्गात येणारी आव्हाने आणि संधी यामुळे ती भरकटणार नाही याची खबरदारी तो घेतो. त्या दोघांचे प्रवास कसे उलगडत जातात, हे बघणे रोचक असेल.

बघत रहा, ‘बादल पे पांव है’ फक्त सोनी सबवर 10 जूनपासून दर सोमवार ते शनिवार रात्री 7.30 वाजता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here