मुंबई, 9 नोव्हेंबर, २०२३:
ल्युब्रिकंट्स उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी, गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडने मुंबईमध्ये सादर केली “चायपकोडा” राईड. आशिया खंडातील प्रीमियर मोटरसायकलिंग फेस्टिवल म्हणून नावाजल्या जाणाऱ्या इंडिया बाईक वीकच्या इकोसिस्टिममधील एक महत्त्वाची परंपरा आहे “चायपकोडा” राईड! इंडिया बाईक वीकच्या दहाव्या एडिशनची सुरुवात सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये चाय पकोडा राइड्सने झाली आणि त्यासोबतच सुरु झाला या वर्षीचा, मोटरसायकलिंग साहस, सौहार्द आणि संस्कृतीचा सोहळा. यंदा गल्फच्या सहयोगाने आयोजित केली जात असलेली ही इव्हेन्ट रायडर्स आणि दर्शकांसाठी अतिशय रोमांचक अनुभव ठरणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-विशाल-बागायतकर-यांचे-राष/
मुंबई चाय पकोडा ब्रेकफास्ट राईडला प्रचंड प्रतिसाद लाभला. या भागातील तब्बल 1000पेक्षा जास्त उत्साही रायडर्स यामध्ये सहभागी झाले होते. विविध पार्श्वभूमी असलेले रायडर्स आपल्या वेगवेगळ्या मोटरसायकल्स घेऊन राईडसाठी आलेले होते, यामध्ये गडगडाट करणाऱ्या हार्लेजपासून वेगवान केटीएम आणि यामाहापर्यंत अनेक बाईक्स सेंटर वन मॉल – पार्किंग, सेक्टर 30A, वाशी, नवी मुंबई येथे जमा झाल्या होत्या. तिथून त्यांनी शीतल दा ढाबा, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मावळ, लोणावळा र्यंत 80 किमी लांब प्रवासाला सुरुवात केली.
या संपूर्ण इव्हेन्टमध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले होते. प्रत्यक्ष रस्त्यांवर उतरण्याआधी सर्व रजिस्टर्ड बायकर्ससाठी अनिवार्य ‘सेफ्टी रायडींग’ सेशन घेण्यात आले. या राईडमध्ये आयबीडब्ल्यू मार्शल्स देखील होते, ज्यांनी रायडर्सच्या एकेक ग्रुप्सचे नेतृत्व केले, त्यामुळे राईडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना इतरांसोबत एकत्र आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता आला. हेल्मेट आणि शूज घालणे प्रत्येक रायडरसाठी अनिवार्य होते आणि गल्फने प्रत्येक रायडरला व्हिजिबिलिटी वाढवणारी फ्लोरोसेंट सेफ्टी जॅकेट्स पुरवली होती. गरज भासल्यास वैद्यकीय सुविधा तातडीने पुरवल्या जाव्यात यासाठी एक रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होती. राईड जिथे संपली त्याठिकाणी सर्व रायडर्सनी पुशअप आणि बर्पी चॅलेंज यासारख्या साहसी ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला आणि ही राईड अजूनच रोमांचक व संस्मरणीय बनवली.
गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडचे हेड ऑफ मार्केटिंग श्री. अमित घेजी यांनी आयकॉनिक चायपकोडा राइड्ससोबत गल्फच्या सहयोगाबाबत अभिमान व आनंद व्यक्त करताना सांगितले, “दहाव्या इंडिया बाईक वीकच्या सहयोगाने मुंबई मध्ये ही उत्साहवर्धक चाय-पकोडा राईड प्रस्तुत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या राइड्स मोटरसायकलिंग समुदायाच्या उत्साहाचे प्रतिबिंब आहेत, त्यामधून सौहार्दाच्या भावनेला व खुल्या रस्त्यांबाबतच्या प्रेमाला प्रोत्साहन मिळते. देशभरातील मोटरसायकलप्रेमींसाठी रायडींग अनुभवात सुधारणा घडवून आणण्यासाठी गल्फ वचनबद्ध आहे. आमचा हा सहयोग ही वचनबद्धता दर्शवतो. रायडर्सना प्रेरित करणे आणि पाठिंबा देणे हा आमचा उद्देश आहे, बायकिंगची आवड पूर्ण करण्याबरोबरीनेच त्यांना सुरक्षित व आनंददायी प्रवासाचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.”
दहावा इंडिया बाईक वीक हा भारतातील मोटरसायकलिंग संस्कृतीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. इंडिया बाईक वीकचे अतिशय आवडते वैशिष्ट्य चाय-पकोडा राइड्समध्ये रायडर्सना भारतीय चहा आणि भज्यांचा आस्वाद घेता-घेता भारतातील मोहक निसर्गसंपदेचा देखील आनंद घेण्याची संधी मिळते.
गल्फ मोटरसायकलिंग कम्युनिटीप्रती दीर्घकाळापासून वचनबद्ध आहे, त्यांच्या नेमक्या गरजा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक, उच्च दर्जाचे ल्युब्रिकंट्स ही कंपनी पुरवते. इंडिया बाईक वीकच्या सहयोगाने गल्फ बायकर्स आणि राईडप्रेमींना उत्तम अनुभव मिळावा, सर्वांसाठी मोटरसायकलिंगच्या अनुभवात सुधारणा व्हावी यासाठी उत्सुक आहे.