मनोरंजन : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण

0
59

मुंबई: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण झाली असल्याचे वृत्त हाती आले आहे. सलमान खानने त्याच्या प्रोडेक्ट्सचे शुटिंग डेंग्यूची लागण झाल्यामुळे रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खान सध्या बिग बॉस १६ या रियालिटी शोचे होस्ट करत आहे. पण आता डेंग्यूची लागण झाल्यामुळे सलमान खान पुढील काही आठवडे बिग बॉस शो होस्ट करु शकणार नसल्याचे सांगितले जात आहे.

सलमान खानच्या जागी आता करण जोहर बिग बॉसचा शो होस्ट करणार आहे. सलमान खानने स्वतः करण जोहरला फोन करून शो होस्ट करण्यास सांगितले आणि करण जोहरने देखील हा शो होस्ट करण्यासाठी होकार दर्शविला . बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी करणला देखील मोठी रक्कम देण्यात आली असल्याची माहिती समोर आली .
सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर येताच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here