मनोरंजन: शेरलॉक होम्सच्या संगतीनं मे महिन्याच्या सुट्टीत सोडवा चित्तथरारक रहस्य!

0
186
SHERLOCK HOLMES, स्टोरीटेल,
मनोरंजन: शेरलॉक होम्सच्या संगतीनं मे महिन्याच्या सुट्टीत सोडवा चित्तथरारक रहस्य!

स्टोरीटेल सादर करत आहे ‘शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा’ अभिनेता कवी गायक संदीप खऱे यांच्या आवाजात!

शेरलॉक होम्स होता तरी कोण? एक काल्पनिक पण प्रभावी व्यक्तिमत्व ! निरिक्षण आणि निष्कर्ष शास्त्राचा प्रणेता ! गुप्तचरांचा परात्पर गुरू. त्याने अनेक रहस्ये आपल्या बुध्दिचातुर्याने उलगडली. स्कॉटलंड यार्ड या गुप्त पोलिसांच्या बालेकिल्ल्याचा तो फार मोठा आधार होता. तो केवळ बौध्दिक यंत्र नव्हता तर तो संवेदनशील माणूस होता. त्याच्या मध्ये माणूसकीचे निर्झर होते. म्हणून तो ख-या व्यक्तिमत्वा इतकाच लोकप्रिय झाला आहे आणि होतच राहिल…!https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बीपीसीएलला-उत्पादनस्प/

सर ऑर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा जगभर लोकप्रिय झाल्या. जगभरातील सर्व भाषांत त्यांची भाषांतरे झाली. एवढेच नव्हे तर शेरलॉक होम्सच्या रहस्यकथांवर आधारित अनेक टि.व्ही.मालिका आणि चित्रपट निघाले. इतकेच नव्हे तर शेरलॉक होम्सचे आधुनिक काळातील रूप कसे असेल अशी कल्पना करूनही अनेक कथा, मालिका व चित्रपट तयार झाले. शेरलॉक होम्स हे नाव त्यामुळेच जागतिक साहित्यात अजरामर झाले.

स्टोरीटेल ने शेरलॉक होम्सला सर्व भाषांमधून ऑडिओबुक स्वरूपात सादर करायचे ठरवले आणि इंग्रजीसह अनेक युरोपयिन भाषांत होम्सच्या कथा सादर केल्या आहेत. मराठीमध्ये सुप्रसिध्द लेखक आणि नाट्यकर्मी भालबा केळकर यांनी केलेले शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांचे अनुवाद लोकप्रिय आहेत. स्टोरीटेलसाठी त्यातील वीस रहस्य कथांचे सादरीकरण संदीप खरे यांनी अभिवाचन करून केले आहे.

मे महिन्याच्या सुट्टीत कुमार वयोगटातील मुलांना या रहस्यकथा ऐकताना जुना ब्रिटीश काळ आणि तेव्हाची संस्कृती समजेल तर रहस्यकथा प्रेमी वाचकांना या कथा नव्याने ऐकताना पु्र्नप्रत्ययाचा आनंद मिळेल. एक मे पासून दर दिवसाआड एक कथा याप्रमाणे या वीस कथा स्टोरीटेलवर प्रकाशित होणार आहेत. शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांचे संदीप खरे यांनी केलेले अभिवाचन ऐकण्यासाठी लिंक

https://www.storytel.com/in/en/books/sherlock-holmes-chya-chaturya-katha-part-1-2397127

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here