‘मन उडु उडु झालं’ ही मालिका प्रचंड गाजते आहे. त्यातील इंद्रा आणि दिपूची जोडी देखील प्रेक्षकांना आवडते आहे. सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह आहे. या मालिकेत देखील प्रेक्षकांना नवरात्रीची धूम पाहायला मिळणार आहे.
हृताने या मालिकेतील नवरात्री सीक्वेन्सच्या शूटिंगचे सगळे डिटेल्स एका बिहाईंड द सीन व्हिडिओमध्ये कैद करून तो व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हे शुटिंग पूर्ण या करण्यासाठी चक्क संपूर्ण टीमला चक्क 35 तास लागले असे तिने सांगितले आहे. त्याशिवाय हृताने संपूर्ण टीमचे आभार मनात कृतज्ञता देखील व्यक्त केली. मालिकेप्रमाणेच या व्हिडिओला देखील प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत.