राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. या प्रकरणी केतकी चितळेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीला शनिवारी पोलिसांनी अटक केली. आज तिला ठाणे कोर्टामध्ये हजर करण्यात आले. ठाणे कोर्टाने तिला याप्रकरणी 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या पोस्टवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले आहेत. केतकीविरोधात निदर्शने केली जात आहे. केतकीविरोधात कळवा व्यतिरिक्त राज्यातील अनेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


