बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने, पुढील 3-4 दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ,मराठवाडा या भागात ढगाळ हवामान असणार आहे तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कापूस, मका या पिकांना या पावसाने धोक्यात आणले आहे. या पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत.पावसामुळे काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झाले आहे.तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.


