हवामानात गेल्या दोन दिवसात खूप फरक पडला आहे.महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे.विदर्भ-मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस महाराष्ट्रातील कमी हवेचा दाब आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे समुद्रात बाष्प निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र, शीत, बाष्प, उष्ण हवा, आर्द्रता आणि कमी दाबामुळे विदर्भ, मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे.


