राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी केतकीविरोधात राज्यभरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी तिला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत केतकी चितळेने मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
मराठी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सध्या तुरुंगामध्ये आहे.ठाणे न्यायलयाने आज जामीन मंजूर केला आहे. केतकी चितळेला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. केतकीला जामीन मिळाला परंतु केतकीला पुढचे काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.कोर्टाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली होती. याप्रकरणी केतकीला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर केतकीला जामीन मंजूर केला. केतकी चितळे सध्या तळोजा येथील तुरुंगात आहे केतकीला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे दिलासा जरी मिळाला असला तरी सुद्धा केतकीला पुढचे काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. कारण केतकी आणखी एका प्रकरणामध्ये आरोपी आहे. या प्रकरणी तिच्या जामीनावर येत्या 21 जून रोजी सुनावणी होणार आहे.


