मलेरियावरील ‘मॉस्किरिक्स’ या जगातील पहिल्या,एकमेव लसीला WHO ची मंजूरी

0
129

जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी प्राणघातक मलेरियाविरुद्ध लसीला मंजूरी दिली आहे.ही जगातील पहिली मलेरियावरील लस आहे.मॉस्किरिक्स ही जगातील पहिली आणि एकमेव मलेरियावरील लस आहे.ही लस आफ्रिकेतील मलेरियाविरुद्ध प्रभावी ठरू शकतेअसे शास्त्रज्ञांचे मत आहे.

1987 मध्ये ग्लॅक्सोस्मिथक्लाइन  ही लस विकसित केली होती.मॉस्किरिक्सचे चार डोस द्यावे लागतात आणि काही महिन्यांनी संरक्षण निरुपयोगी होते.2019 नंतर, घाना, केनिया, मालावी येथील मुलांना मॉस्किरिक्सचे 23 लाख डोस देण्यात आले. हा पायलट प्रोग्राम डब्ल्यूएचओने समन्वित केला होता.मॉस्किरिक्सचा सक्रिय पदार्थ प्लास्मोडियम फाल्सीपेरम परजीवीच्या पृष्ठभागावर आढळणाऱ्या प्रथिनांपासून बनवला आहे. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की लसीचे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत, परंतु कधीकधी तापासह सौम्य झटके देखील येऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here