महादिशा पोर्टलवर विविध योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0
17

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगर मार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महामंडळाच्या विविध योजनांकरिता कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांच्या स्वयंरोजगार, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (पीएम-एजेएवाय) अंतर्गत ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करून जीवनमान उंचावणे हा या योजनांचा मुख्य उद्देश असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होणार असून इच्छुक लाभार्थ्यांनी आपले अर्ज https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर करावेत. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष कार्यालयात कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here