महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील मंदिरात गुरुवारी दुपारी बारा वाजता घटस्थापना करण्यात आली.जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते घटस्थापना झाली.राज्य शासनाच्या आदेशानुसार गुरुवारपासून महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांसाठी उघडण्यात आली असून त्यामुळे भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे. गुरुवारपासून शारदीय नवरात्रौत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून तुळजाई नगरीत भाविकांची गर्दी वाढली आहे.
मंचकी निद्रा संपवून कुलस्वामानी आई तुळजाभवानी माता गुरुवारी पहाटे सिंहासनावर विराजमान झाली. त्यानंतर अभिषेक,पूजा करण्यात आली. मंदिर प्रशासनाने दररोज दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार शुक्रवारपासून दररोज 15 हजार भाविकांना कोविड नियमांचे पालन करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे .


