दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिअंटमुळे आता जगभराची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.खबरदारी म्हणून अनेक देशांनी आफ्रिकेतील विमानांवर काही काळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नव्या व्हेरिअंटमुळे देशात किंवा राज्यात त्याचा लगेच परिणाम व्हावा अशी परिस्थिती सध्या तरी नाही.फक्त सतर्क राहावे लागेल एवढे मात्र नक्की तसेच काही निर्बंध पुन्हा आणावी लागतील असं त्या क्षेत्रातल्या मान्यवरांचे मत आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.“आपण प्रत्येक जिल्ह्यातून साधारणपणे महिन्याला 100 सॅम्पल्स घेतो. त्यांचे जिनोमिक सिक्वेन्सिंग करतो. त्यातून डेल्टा व्हेरिअंट आहे की अजून काही नवीन व्हेरिअंट आहेत. याची तपासणी केली जाते. हा प्रकल्प अजूनही सुरूच आहे. त्यात अजून तरी नवीन कोणताही नवीन व्हेरिअंट आढळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम आपण करू”, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

