राज्यातील करोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.उठलेल्या निर्बंधानंतर लोकांनी ठिकठिणी केलेले गर्दी बघता आणि कोरोनाचे निर्बंध म्हणजेच मास्क आणि गर्दी टाळली नाही तर एक किंवा दोन महिन्यांत करोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्याची भीती टास्क फोर्सने क्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागास सूचना दिल्या आहेत.संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आतापासूनच आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे शहरी आणि ग्रामीण भागात उपलब्धता आणि पुरेसा साठा राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यानी दिल्या आहेत.
“करोनाच्या तिसऱ्या लाटेला मर्यादित कसे ठेवायचे ते आपल्या हातात आहे. आपण गर्दीची ठिकाणे टाळली पाहिजेत आणि दोन मास्कचा वापर केला पाहिजे. जर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तिसरी लाट मोठी होईल,” असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले.तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यभर सिरो सर्वेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे यावर भर देतानाच निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे असल्याचे सांगितले.