महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे निकाल 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता 

0
138

 महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे निकाल 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. निकालाला उशीर झाला तरी 11 वी च्या प्रवेश प्रक्रिया त्याचबरोबर 12 वीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.

कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात काही गोष्टींची उणीव राहिल्याचे बच्चू कडू यांनी कबूल केले. पण तरीही देशाच्या गुणवत्तेत महाराष्ट्र अव्वल आहे, ही बाब महत्त्वाची आहे. आपल्या शिक्षकांनी दुर्गम भागांत जाऊन नवे प्रयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवले, असे सांगून बच्चू कडू यांनी शिक्षकांची प्रशंसा केली. तसेच केंद्रीय शिक्षण खात्यानं 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत आजही अव्वल असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.शिक्षण विभागातील रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर घेण्यात येतील. शैक्षणिक विषमता अत्यंत घातक असून ती देशाला पोकळ करु शकते, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here