तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर सोहम चाकणकर याने पदार्पण केले आहे.सोहम यांचा मुलगा आहे. सोहमच्या वाढदिवशी म्हणजेच 25 मे रोजी या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. स्वतः रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या मुलाच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हिल केला. सोहमला वाढदिवसाच्या निमित्ताने औक्षण करतानाचा आणि पोस्टर लाँचचा असे दोन फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तुझ्या चित्रपट क्षेत्रातील या विश्वात तुला अफाट यश मिळू दे, उत्कृष्ट अभिनेता होशील ही खात्री आहे ,पण उत्कृष्ट माणुस नक्की होशील हा दृढ विश्वास आहे. कारण तू माझ्या गर्भात वाढला आहे. तुझ्या सर्व स्वप्नांना गरुडाचे पंख मिळू देत, जमिनीवर पाय ठेवून आकाशाला गवसणी घाल, माझं आयुष्य मिळू दे माझ्या बाळाला ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!!!,” अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मिती केली असून आणि दिग्दर्शन कपिल जोंधळे दिग्दर्शित ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी लिखित आहे.या चित्रपटातून अभिनेता सोहम चाकणकर आणि अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांची जोडी आहे.


