महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच 8 जून रोजी 12 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
उद्या, बुधवारी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल कुठे पाहवा, मार्कशीट कशी डाउनलोड करावी याबाबत आम्ही आपल्यासाठी माहिती घेवून आलो आहे. विद्यार्थी एका क्लिकवर त्यांचा निकाल पाहू शकतात.
www.maharesult.nic.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
त्यानंतर होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा नंतर तुम्हाला एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल. लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा. सबमिट करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.निकालाची प्रिंट तुम्ही काढू शकतात किंवा डाउनलोड करू शकतात.


