महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून राज्य सेवेच्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

0
80

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून राज्य सेवेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लागलीच आज 28 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात पोलिस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदांचा समावेश आहे.

एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती आयोगानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. अधिकृत माहितीनुसार, सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यास 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपासून सुरूवात होईल. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर आहे.

यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 रुपये असणार आहे.मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क असणार आहे. हे परीक्षा शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येणार आहे.मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमदेवार देखील या पदांसाठी अर्ज दाखल करु शकणार आहेत याची नोंद घ्यावी.परंतु मुख्य परीक्षेपूर्वी त्यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक असार आहे. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी तर महिला उमेदवारची उंची 157 सेमी असणं आवश्यक आहे.पुरुष उमेदवारांना किमान 5 सेमी छाती फुगवता येणे आवश्यक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here