राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्त झाले आहेत.छगन भुजबळांनी या प्रकरणात आपले नाव गुन्ह्यातून वगळण्यात यावे अशी याचिका सत्र न्यायालयामध्ये दाखल केली होती. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देऊन भुजबळांना मुक्त केले आहे.
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळी विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपात मिळाला असा आरोप होता. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणामध्ये राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते.छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांचा तुरुंगवास झाला होता.