महिंद्रा ऑटोने 21% वाढीसह 66,091 युनिट्सची आतापर्यंतची सर्वोच्च वाहन विक्री नोंदवली !

0
39
महिंद्रा ऑटोने 21% वाढीसह 66,091 युनिट्सची आतापर्यंतची सर्वोच्च वाहन विक्री नोंदवली !
महिंद्रा ऑटोने 23 मार्चमध्ये 31% वाढीसह 35,976 ची सर्वोच्च SUV विक्री

23 मार्चमध्ये 31% वाढीसह 35,976 ची सर्वोच्च SUV विक्री

मुंबई, 3 एप्रिल 2023: महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M Ltd.), एक भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह कंपनीने मार्च 2023 मध्ये तिची वाहन विक्री 31% च्या वाढीसह 35,976 वाहनांची विक्री नोंदविल्याचे आज जाहीर केले आहे.आतापर्यंतची सर्वोच्च वाहनांची विक्री असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. कंपनीने 60% वाढीसह 356,961 युनिट्सवर आपल्या SUV ची आतापर्यंतची सर्वोच्च वार्षिक विक्री देखील नोंदवली आहे. पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये (ज्यामध्ये यूव्ही, कार आणि व्हॅनचा समावेश आहे), कंपनीने मार्च 2023 मध्ये 35,997 युनिट्स (30% ची वाढ) विकली आणि 359,253 वाहनांची वार्षिक विक्री नोंदवली (59% ची वाढ) आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पुणे-जिल्हा-परिषदेच्या/

मार्च 2023 मध्ये कमर्शियल व्हेईकल सेगमेंटने 22,282 वाहनांची विक्री नोंदवली (12% वाढ) आणि वार्षिक 248,576 वाहनांची विक्री (40% वाढ). LCV (2 - 3.5T) सेगमेंटने F23 मध्ये 198,121 युनिट्सची आतापर्यंतची सर्वोच्च वार्षिक विक्री नोंदवली आहे. महिंद्रा ट्रक आणि बस विभाग (LCV > 3.5T + MHCV), मार्च 2023 मध्ये 1,469 युनिट्ससह चांगली कामगिरी नोंदवली (77% वाढ) असून 10,036 युनिट्सची वार्षिक विक्री (56% वाढ) केली आहे.त्याशिवाय या महिन्यात 2,115 वाहनांची निर्यात झाली असून कंपनीने मार्च 2023 मध्ये 3-चाकी वाहनांच्या 5,697 युनिट्सची विक्री केली आहे.

ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष,विजय नाकरा, M&M Ltd. यांच्या मते, “ऑटो सेक्टर व्यवसायाच्या जवळजवळ सर्वच  विभागांमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक संख्येसह वर्ष संपताना 50% वाढी झाल्याने आम्हाला आनंद होत आहे. आमच्‍या SUV व्‍यवसायाने मार्च 2023 मध्‍ये 31% वाढीसह सार्वकालिक उच्चांक नोंदवला, तर संपूर्ण पोर्टफोलिओमध्‍ये चांगल्या मागणीमुळे F23 मध्‍ये एकूण 60% अशी वाढ नोंदवली आहे. पिक-अप (LCV 2-3.5T) सेगमेंटनेसुद्धा 43% वाढीसह आतापर्यंतचे सर्वोच्च वार्षिक व्हॉल्यूम नोंदवले आहे, त्यामुळे त्यांचे नेतृत्व स्थान मजबूत झाले आहे. ज्यांनी आमचे हे वर्ष उल्लेखनीय बनविले अशा आमच्या सहयोगी, डीलर्स, भागीदार, पुरवठादार आणि ग्राहक यांचे आम्ही आभार मानतो असेही ते म्हणाले 



 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here