सिंधुदुर्ग: महिंद्रा ॲड महिंद्रा फायनान्सियल लिमिटेडची उप कंपनी असलेल्या महिद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड (MRHFL) आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांनी कॅश मेनेजमेंट सोल्युशनसाठी भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. या करारनाम्याचा भाग म्हणून आयपीपीबीमार्फत सर्व टपाल कार्यालये MRHFL कॅश मॅनेजमेंट आणि संकलन सेवा देणार आहेत. कॅश मॅनेजमेंट सेवेमुळे ग्राहकांना सर्व टपाल कार्यालयांमधून आपल्या कर्जांचे मासिक किंवा तिमाही हप्ते भरता येतील. आयपीपीबीच्या विस्तृत राष्ट्रीय नेटवर्क, तळागाळात असलेली टपाल विभागाची पोहोच आणि साधे व सोपे तंत्रज्ञान यामुळे MRHFL ला गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने कॅश मॅनेजमेंट व्यवस्थापन लागू करणे सोपे होणार आहे.
वित्तीय क्षेत्रातील ही एक महत्वपूर्ण भागीदारी असून यातून ग्राहकांना सामावून घेण्याचे दोन्ही संस्थांचे लक्ष्य असल्याचे अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांनी सांगितले आहे.