महिलेने मगितली 1 लाखांची खंडणी; रत्नागिरीत गुन्हा दाखल

0
194
कर्वेनगरमधील विद्यार्थी लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षण संस्थाचालकाला अटक
पुण्यातील एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी पुणे पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केली आहे

रत्नागिरी- एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 8 मे रोजी सकाळी 10 वा. सुमारास राजीवडा नाका येथे घडली. फैमीदा मुस्ताक काझी (रा. कोकणनगर, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात अस्फीया ताहीर मुल्ला (31,रा.राजीवडा नाका, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

त्यानुसार,शनिवारी फैमीदाने अस्फीयाच्या मोबाईलवर फोन केला. आणि मी तुझ्या नवऱ्याला फोन करत होते पण त्याने उचलला नाही.त्याला एक लाख रुपये द्यायला सांग नाहीतर त्याला खोट्या आरोपामध्ये फसवेन अशी भीती घातली. तसेच माझ्या सोबत रियाना पकाली,फौजीया आणि अझमीना या तिघीसुद्धा आहेत असे सांगून खंडणी मागितली. याप्रकारणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वांगणेकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here