उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यात असलेल्या माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहण करत असताना हिमस्खलनाची घटना घडली.या दुर्घटनेमध्ये नौदलाचे पाच जवान आणि एक पोर्टर बेपत्ता झाले होते. शनिवारी हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्च ऑपरेशन करण्यात आले यावेळी या चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
गिर्यारोहण मोहिमेसाठी मुंबईवरुन 3 सप्टेंबर रोजी एकूण 20 सदस्यांची टीम रवाना झाली होती. ही 20 जणांची टीम 7,120 मीटर उंच माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहणासाठी गेली होती. पण त्याच दरम्यान हिमस्खलन झाले आणि भारतीय नौदलाचे पाच जवान आणि एक पोर्टर बेपत्ता झाला. शनिवारी नौदलाचे तीन अधिकारी आणि एका नाविकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आळा. हे सर्वजण एक गिर्यारोहण मोहिम दलाचे सदस्य होते. इतर जणांचा शोध सुरु आहे.
या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट कमांडर रजनीकांत यादव, लेफ्टनंट कमांडर योगेश तिवारी, लेफ्टनंट कमांडर अनंत कुकरेती आणि नाविक हरिओम यांचा समावेश आहे. पाचवा नौदल अधिकारी आणि पोर्टरचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. यापैकी रजनीकांत यादव आणि अनंत कुकरेती हे मुंबईतील नाविक तळात तैनात होते.इतर जणांचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.