मानखुर्दच्या बालसुधारगृहातील मुलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. एकूण 18 मुलांना कोरोनाची लागण झाली असून या सर्व मुलांवर उपचार सुरु आहेत.25 ऑगस्ट रोजी शताब्दी रुग्णालयात एका मुलाची कोरोना तपासणी करण्यात आली. तर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. 26 ऑगस्ट रोजी इतर दोन मुलांची तपासणी करण्यात आली तर त्यांना देखील कोरोना झाल्याचे समजले.बालसुधारगृहातील इतर मुलांची देखील कोरोना तपासणी करुन घेतली असता 15 मुलांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. अशा एकूण 18 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
सेंट जोसेफ अनाथाश्रमातील 16 मुलं आणि सहा महिला कर्माचारी अशा एकूण 22 जणांना कोरोनाची लागण आताच झाल्याचेही समोर आले होते. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य पथकाने सतर्क होत


