मालवण – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवार १४ मे रोजी मालवण दौऱ्यावर येत आहेत. दुपारी १२ वाजता ते भारतीय जनता पार्टी मालवण कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी भाजपा मालवण शहर व ग्रामीणच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे.
यावेळी सर्व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, तालुका कार्यकारणी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व सर्व आघाड्याच्या अध्यक्षांनी व कमिटीने यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


