मुंबईकरांचा काही भागातील पाणीपुरवठा 5-6 ऑक्टोबरला राहाणार बंद!

0
100

मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पाणी जपून वापरण्याचे बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे. कारण मुंबईतील काही भागात येत्या 5 आणि 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहाणार आहे. महापालिकेच्या ‘एफ दक्षिण विभागातील परळ,काळेवाडी,नायगाव परिसरातील तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत.

या विभागातील मंगळवार,5 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजेपासून बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत परिसरातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी खंडित करण्यात येणार असल्याचा माहिती अशी माहिती महापालिकेने दिली आहे परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन महामालिकेद्वारे करण्यात आले आहे.

परळगाव येथील गं. द. आंबेकर मार्ग 50 टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळगाव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड या परिसरांना दररोज दुपारी 1.45 ते सायंकाळी 4.45 या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असल्याने 5 ऑक्टोबर 2021 रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

काळेवाडी येथील परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी या परिसरांना दररोज रात्री 8.30 ते 11.30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. पण, 5 ऑक्टोबर 2021 रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

नायगाव येथील जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रींग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये बाजार, भोईवाडा गांव आणि हाफकिन या परिसरांना दररोज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. पण, 6 ऑक्टोबर 2021 रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here