मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे भारतातच असून, मुंबईत त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते महाराष्ट्राबाहेर असल्याची माहिती परमबीर यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. न्यायालयाने मागील सुनावणी वेळी परमबीर सिंह कुठे गेले अशी विचारना केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली असून, परमबीर सिंह हे देशाच्या बाहेर गेले नसून ते भारतातच असल्याचे त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले आहे. त्यांच्या जीवाला महाराष्ट्रात धोका असल्याने ते महाराष्ट्राबाहेर गेले आहे अस त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले आहे.
परमबीर सिंह यांची 48 तासांमध्ये कोणत्याही सीबीआय अधिकारी अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची तयारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली. सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांनी चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.


