मुंबई:अपेक्स इंडस्ट्रियल इस्टेट परिसरामध्ये असलेल्या एका सॅमसंग कंपनीच्या गोडाऊनला आज आग लागली आहे. आगीचे वृत्त समजताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. फ्रीज आणि एसीचे कॉम्प्रेसर जळाल्यामुळे या आगीचा भडका उडाला. काही ऑईलची गोदामे देखील या आगीत जळून खाक झाली आहेत. सुदैवानं या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त हाती आले आहे