कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेत सरकारने लसीकरण मोहीमेवर भर दिला आहे.जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यावर लक्ष केंद्रीत केले आहे.मुंबईमध्ये 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे त्यांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यास मुंबई महापालिकेने सुरुवात केली आहे.
याचाच एक भाग म्हणून आणि महिलांनी लसीकरणात उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उद्या म्हणजे शुक्रवारी शासकीय आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांनाच लस देण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे.
मुंबईतील शासकीय आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत फक्त महिलांनाच लस दिली जाणार आहे. महिलांना लसीकरण केंद्रावर येऊन पूर्व नोंदणी न करताही कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. याची नागरिकांनी नोंद ग्यावी असे कळवण्यात आले आहे.या विशेष सत्रानिमित्त ऑानलाईन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.शुक्रवारी मुंबईतील शासकीय आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर पुरुषांना प्रवेश मिळणार नाही.या प्रयोगामुळे महिलांमध्ये लस घेण्याचे प्रमाण वाढेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.