मुंबईत येत्या 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी पाणीकपात होणार आहे.26 ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सकाळी 10 ते बुधवारी म्हणजे 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीकपात करण्यात येणार आहे. एस, के/पूर्व, एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागामध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप संकूल येथील उदंचन केंद्रात दोन 1200 मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील तृतीय टप्प्याच्या उदंचन केंद्रातील एक नादुरुस्त उदंचन संच काढून त्या ठिकाणी राखीव उदंचन संच बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम 26 ऑक्टोबर सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यामुळे या वेळेत मुंबई महानगरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातील सर्व भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या भागात 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
पवई येथे 1800 मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे काम मंगळवार 26 ऑक्टोबर सकाळी 10 वाजल्यापासून 27 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.
एस विभाग – फिल्टरपाडा एस एक्स – 6 – (24 तास) – जयभिम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा – के/पूर्व विभाग – मरोळ बस बार क्षेत्र, केई 1- (दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 वाजता) – चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक 1 व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर
– के/पूर्व विभाग – सहार रोड क्षेत्र, केई 1 – (दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 वाजता) – कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत
– के/पूर्व विभाग – ओम नगर क्षेत्र, केई 2 – (पहाटे 4 ते सकाळी 8 वाजता) – ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाईपलाईन क्षेत्र)
– के/पूर्व विभाग – एम. आय. डी. सी. व भवानी नगर केई 10 – (सकाळी 11ते दुपारी 2 वाजता) – मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक 1 ते 23, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज
– के/पूर्व विभाग – विजय नगर मरोळ क्षेत्र, केई – 10ए – (सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजता) – विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा
– के/पूर्व विभाग – सिप्झ तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ (24 तास)
– एच/पूर्व विभाग – बांद्रा टर्मिनल पुरवठा क्षेत्र
– जी / उत्तर विभाग – धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत) – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग
– जी / उत्तर विभाग – धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (पहाटे 4 ते दुपारी 12वाजेपर्यंत) – प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग


