मुंबई:मुंबई पोलिस उपायुक्त यांनी मुंबईसह परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा जमावबंदीचा आदेश 8 एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम 144 नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे .या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणे, मोर्चा काढणे, फटाके फोडणे त्याचबरोबर ध्वनिवर्धकाचा देखील वापर करता येणार नाही.
मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पॅराग्लायडर्स, बलून, पतंग उडवणे, उंच जाणारे फटाके तसेच लेसर प्रकाश (बीम) यास 20 फेब्रुवारीला प्रतिबंध असल्याचा आदेश काढण्यात आला होता. हा आदेश 20 एप्रिल 2022 पर्यंत हा आदेश लागू असणार आहे.
जमावबंदीच्या आदेशातून विवाह समारंभ आणि मंगल कार्ये, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था आणि संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना वगळण्यात आले आहे.तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणारी गर्दी यांनाही वगळण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.असे आयुक्तांनी जाहीर केले आहे


