मुंबईपाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट पुणे ! पालकमंत्री अजित पवार यांनी बोलावली तातडीची बैठक

0
119

देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढत चालल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत असले तरी राज्यात मात्र कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख सारखा वर चढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 43211 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे 33356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे.

राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा 1605 झाला आहे. अशातच राज्याचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेले पुणे हे मुंबईपाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या 10000 वर पोहोचली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी तातडीने आढावा बैठक बोलावली आहे..राज्यात कोरोनाव्हायरसची तिसरी लाट आली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

राज्यात मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे तिसऱ्या लाटेत देखील हॉटस्पॉट ठरली आहेत. मुंबईपाठोपाठ पुणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. पुण्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे. पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. बैठकीला शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here