सिंधुदुर्ग मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई व्दारा रोजी 29 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई यांचे कार्यालय मध्ये 116 वी डाक अदालत आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधीत पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्य आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल.
विशेष: टपाल, स्पीड पोस्ट, काऊटर सेवा, डाक वस्तू, पार्सल बचत बँक व मनिऑडर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितानी डाक सेवेबातची आपली तक्रार एम. शात्नला भट्ट,सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि) आणि सचिव.डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय मुंबई जी पी ओ इमारत, दुसरा माळा,मुंबई-400001 यांचे नावे दोन प्रतीसह दिनांक 10 सप्टेंबर 2021 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
हे प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेब साईट www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.असे माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग,सिंधुदुर्गनगरी यांनी कळविले आहे