प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरची परशुराम घाटातली वाहतूक आजपासून नियमित सुरु होत आहे. घाटातील चौपदरीकरणाच्या रुंदीकरणासाठी इथली वाहतूक महिनाभर दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
या महिनाभरात ठराविक वेळेत घाटातील वाहतूक बंद ठेवून रुंदीकरणाचे अवघं 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. कंत्राटदार कंपन्यांची मुदतवाढीची मागणी महामार्ग विभागाने नाकारली. आता आजपासून परशुराम घाट नियमित सुरु होत आहे.