प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
चिपळूण (ओंकार रेळेकर)मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळून दोन पोकलेन मातीखाली गेले आणि या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला. यानंतर गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी घाटामध्ये जावून प्रत्यक्ष पाहणी केली आणि दुर्घटनेमुळे काम थांबवून ठेवल्यास धोका अधिक वाढू शकतो. शिवाय वरच्या भागात परशुराम गाव वसलेले आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून, काही संभाव्य धोका असल्यास त्याची त्यांना कल्पना देवून हे काम तात्काळ सुरू करा, अशी सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. परशुराम घाटात काल (दि. ८) ही दुर्घटना घडली.
त्यानंतर घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आमदार श्री. जाधव हे काल त्यांचे व्याही श्री. दिलीपराव माने-पाटील यांचे निधन झाल्याने कोल्हापूरमध्ये होते. मात्र, तिथूनही सातत्याने अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून वाहतूक सुरळीत होण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. रात्री उशिरा ते चिपळूणमध्ये पोहोचले आणि त्यानंतर आज सकाळी ताबडतोब त्यांनी परशुराम घाटात जावून पाहणी केली आणि पोलीस, राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यांना काही सूचनाही केल्या. यावेळी श्री. फैसल कास्कर, श्री. मिलिंद कापडी हेसुध्दा उपस्थित होते.
फोटो : मंगळवारी दरड कोरलेल्या परशुराम घाटाची पाहणी करतांना आ.भास्करराव जाधव,फैसल कासकर, मिलिंद कापडी, संतोष तांदळे छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)