मुंबई: मुंबई मेट्रो दोन मार्गांवरून मुंबईकरांच्या सेवेत गुढीपाडव्यापासून रुजू झाली. मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए या मार्गावरील सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी केले. त्यावेळी अजित पवार यांनी नागरिकांना आपल्या भाषणातून कठोर समज दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले,”मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची गुढी उभारली जात आहे.कुठलाही प्रकल्प सहज उभा राहत नाही त्यासाठी झोकून देऊन काम करावे लागते.मुंबईचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या नैतृत्वाखाली काम सुरू आहेत. मुंबईकरांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे”.
मेट्रोत कुठेही पचकन थुंकु नका असले धंदे करु नका. मेट्रोत घाण करू नका, बाहेर हात काढू नका. परदेशातील परिस्थिती पहा. तेथे गेल्यावर मुकाट व सरळ वागता इथे आवो जावो घर तुम्हारा असे आहे याचा फायदा घेऊ नका असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.मुंबई बलिदानातून मिळवली ती जपण्याचा व वाढवण्याचा संकल्प आपण करूया असेही ते म्हणाले.


