मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांना शिरगाव बाजारपेठ भावपूर्ण श्रद्धांजली

0
101

२६/११ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांना शिरगाव बाजारपेठ येथे ग्रामस्थांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व स्तरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा दहशतवादी हल्ला असा झाला होता. त्यात महाराष्ट्राचे तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढतांना त्यांना वीरमरण आले होते. 2008 ची ती रात्र भयानक होती.आज या गोष्टीला १३ वर्ष पूर्ण होत आहेत.या हल्ल्यात सामील असलेल्या 10 दहशतवाद्यांची नावे आहेत – अजमल अमीर, अबू इस्माईल डेरा, हाफीज अर्शद, बाबर इम्रान, जावेद, शोएब, नझीर अहमद, नसीर, अब्दुल रहमान, फहदुल्ला आणि अजमल कसाब. यामध्ये 9 दहशतवादी मारले गेले आणि फक्त कसाब जिवंत पकडला गेला. रात्री 9.30 च्या सुमारास दोन दहशतवादी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या मुख्य हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दोघांच्या हातात एके 47 रायफल होत्या आणि पंधरा मिनिटांत त्यांनी 58 लोकांना ठार आणि 109 जण जखमी केले होते. मीडियाच्या लाईव्ह कव्हरेजमुळे कुठे काय चाललंय ते सगळे आत TV वर दहशतवादी बघत होते.त्यामुळे त्यांना हल्ला कुठे करावा यासाठी मदत झाली. 60 तासांच्या कारवाईनंतर सुरक्षा दलांनी सर्व दहशतवाद्यांना ठार केले.हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये युरोपियन युनियन संसदीय समितीचे आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अनेक सदस्य देखील उपस्थित होते, त्यांच्यापैकी कोणालाही इजा झाली नाही.मुंबई दहशतवादी हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले. कामा हॉस्पिटलबाहेर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here