राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) परीक्षेचे दरवाजे मुलींसाठीही खुले झाले आहेत.सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट आदेशानंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या परीक्षेला मुली बसू शकणार आहेत.विशेष म्हणजे हा अर्ज भरताना महिलांसाठी शुल्क ठेवण्यात आलेले नाही. एनडीए-२०२१ मध्ये मुलींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. २४ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुली ऑनलाइन अर्ज करू शकतात. इयत्ता १२ वीतील मुलीही अर्ज करू शकतात. मात्र अशा उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी १२ वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
हा अर्ज भरताना भूदल विभागासाठी मान्यताप्राप्त शाळा/शिक्षण मंडळातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नौदल/हवाई दल विभागासाठी फिजिक्स आणि मॅथ्ससह १२ वीची परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असावी. निवड प्रक्रिया करताना महिलांची निवड लेखी परीक्षा व सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या बुद्धिमत्ता -व्यक्तिमत्त्व चाचणीच्या माध्यमातून होईल. यात उत्तीर्ण उमेदवारांनाच एसएसबीच्या चाचणीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे .