मोदी सरकारकडून गणेशोत्सव आणि दिवाळी घरात बसूनच साजरे करण्याची नियमावली जाहीर

0
216

देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट ओसरत असली तर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ झाल्याची दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे. 47 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी नियमावली  जाहीर करण्यात आली आहे. यंदा देखील नागरिकांनी घरात बसूनच सण साजरे करावे, असं आवाहान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करम्यात आले आहे.

कोव्हिड-19 टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल आणि आयसीएमआरचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषद घेत गणेशोत्सव आणि दिवाळीसाठी नियमावली जाहीर केली आहे. देशात केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर या राज्यात गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी सणाच्या दरम्यान गर्दी टाळण्यासाठी सरकारतर्फे नियमावली जाहीर करण्यात आली आहे.नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही देखील संयम दाखवून गर्दी टाळाली, असं आवाहन डॉ. पॉल यांनी केले आहे.कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस घेणं महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. नागरिकांनी जागरुक व्हायला हवं.

ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दुर्गम भागातही लसीकरण झालं पाहिजे. देशात आतापर्यंत केवळ 16 टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. 54 टक्के नागरिकांचं अंशत: लसीकरण झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here