यंदाही दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ! मुलींनी मारली बाजी

0
22

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. यावर्षी 97.96 टक्के मुली पास झाल्या. तर, 96.06 टक्के मुले पास झाले. म्हणजेच परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली पास झाल्या.

कोकण: 99.27%, पुणे: 96.96%, मुंबई: 96.94%, कोल्हापूर: 98.50%, नागपूर: 97%, औरंगाबाद: 96.33%,अमरावती: 96.81%,नाशिक: 95.90%,लातूर: 97.27%

यंदाही मुलींचीच बाजी

यंदा 2021-22 या वर्षाची दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान घेण्यात आली होती. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून 16 लाख, 36 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 8 लाख, 89 हजार विद्यार्थी तर 7 लाख, 49 हजार विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेसाठी राज्यभरात एकूण 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. 5 हजार 50 मुख्य केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here